शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरच्या व्यापाऱ्याने मुंबईच्या व्यापाऱ्याला जवळपास दोन कोटी रुपयांना फसवले .

शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरच्या व्यापाऱ्याने मुंबईच्या व्यापाऱ्याला जवळपास दोन कोटी रुपयांना फसवले .

श्रीरामपूरच्या व्यापाऱ्याने मुंबईच्या व्यापाऱ्याला जवळपास दोन कोटी रुपयांना फसवले ...

 श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील वैष्णवी अलंकार गृह नंबर 2 येथे आरोपी अक्षय बाळासाहेब डहाळे व बाळासाहेब विश्वनाथ डहाळे यांनी मुंबई येथील व्यापारी दिनेश प्रकाश मेहता, वय 47 ,राहणार -विलेपार्ले मुंबई यांच्याकडून सुमारे एक कोटी 98 लाख सहा हजार रुपयांचे सुवर्णालंकार व डायमंड अलंकाराचा व्यवहार केला. 

        या अलंकाराची रक्कम फिर्यादी दिनेश मेहता यांनी आरोपी अक्षय डहाळे व बाळासाहेब डहाळे यांच्याकडे मागितली असता या आरोपींनी फिर्यादी मेहता यांना रक्कम व अलंकार दिले नाही. उलट तुला जे करायचे ते कर ,तुझे सोने व डायमंडचे अलंकार आम्ही देणार नाही व पैसेही देणार नाही असे बोलून फिर्यादीची रक्कम बुडवण्याच्या हेतूने फिर्यादीचे सुवर्णालंकार संगणमत करून ,विश्वास संपादन करुन,हडपण्यासाठी फसवणूक केली म्हणून फिर्यादी प्रकाश मेहता यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 430/2021 भादवि कलम 420,406,34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा काल रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे. 

      या गुन्ह्याचा तपास श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. सानप हे स्वतः करीत आहेत.