शिवप्रहार न्यूज- बेलापूरला तरुणाचा गळफास तर दुसर्या घटनेत विवाहित तरुणी मुलासह बेपत्ता !

बेलापूरला तरुणाचा गळफास तर दुसर्या घटनेत विवाहित तरुणी मुलासह बेपत्ता !
बेलापूर ( शिवप्रहार न्युज )-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे राहणारे गजानन (पिनू ) नाना वायदंडे,राहणार -पाहुणेनगर,बेलापूर,वय वर्ष 35 याने राहत्या घरी गळफास घेवुन जिवनयात्रा संपवली.त्यांच्या मागे पत्नी,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांनी घरात पंख्याला गळफास घेतला.रात्री अकरा वाजता घटना नातेवाईकांच्या लक्षात आली.
दुसर्या घटनेत विवाहीत तरुणी स्वाती बाळासाहेब सोनुळे ,वय वर्षे ३१ ही तीचा मुलगा कुणाल ,वय अडीच वर्षे याच्या सह भरदिवसा बेलापूर येथील पुलावरून बेपत्ता झाली आहे.या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीसात मिसिंगची नोंद करण्यात आली असून पोनि गवळी यांचे मार्गदर्शना खाली हे.कॉ.अतुल लोटके हे तरुणी व मुलाचा शोध घेत आहे.
या दोघांनसंबंधी कोणाला काही माहीती असल्यास त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन फोन नंबर 02022 - २२२६६६ वर संपर्क साधावा असे आवाहन पोलीसांनी केले आहे.