शिवप्रहार न्यूज- उपजिल्हाधिकारी यांच्या गाडीला राहुरी फॅक्टरी जवळ मागून धडक…
उपजिल्हाधिकारी यांच्या गाडीला राहुरी फॅक्टरी जवळ मागून धडक…
राहुरी फॅक्टरी- उपजिल्हाधिकारी श्री.नितीन गवळी हे नगर-मनमाड महामार्गावर त्यांच्या शासकीय वाहनातून नाशिककडून नगर कडे जात असताना त्यांच्या वाहनाला मागून एका ट्रकने जोरदार धडक दिली.अपघातात ते बालंबाल बचावले.
याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी ट्रक चालक चंद्रकांत शिंदे,राहणार-आश्वी याच्या विरोधात सरकारी वाहन चालक भूषण पाटणकर यांच्या तक्रारीनुसार काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघातात उपजिल्हाधिकारी यांचे वाहन ज्यावर मागे महाराष्ट्र शासन असे लिहिलेले होते.त्या मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर एम एच 02 एफई 6051 मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.