शिवप्रहार न्यूज - नगर परिसरात तरुणीवर चौघांचा सामूहिक बलात्कार! ०५ जणांवर गुन्हा दाखल !!

शिवप्रहार न्यूज -  नगर परिसरात तरुणीवर चौघांचा सामूहिक बलात्कार! ०५ जणांवर गुन्हा दाखल !!

नगर परिसरात तरुणीवर चौघांचा सामूहिक बलात्कार! ०५ जणांवर गुन्हा दाखल !!

नगर (शिवप्रहार न्यूज ) नगर शहरात भिंगार कॅम्प पोलिसांच्या हद्दीत काटवण परिसरात एका 27 वर्षे वयाच्या तरुण महिलेला पाच जणांनी रिक्षात व दुचाकीवरून येऊन मारहाण करत शिवीगाळ केली व एका आरोपी महिलेने पीडित महिलेला धरून ठेवून चौघा नराधम आरोपीनीं या असहाय्य पीडित तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला.

      ही घटना काल 24 डिसेंबर रोजी दिवसा घडली.या घटनेने समाजामध्ये किती क्रूर विचाराचे वृत्तीचे गुन्हेगार आरोपी आहेत हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणी 27 वर्षाच्या तरुणीने भिंगार कॅम्प पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी शबनम उर्फ शमीन गफूर शेख ,राहणार- अंबिका नगर,केडगाव या महिलेसह बलात्कार करणारे आरोपी इम्रान शेख राहणार -मुकुंदनगर ,शाहानु शेख राहणार -बारा इमाम कोटला ,रिक्षा चालक अकबर शेख राहणार -झेंडीगेट व बार्शीत खान लिंक रोड केडगाव या पाच जणांविरुद्ध भादवि कलम 376, ड ,ब ,323 ,504 506,34 प्रमाणे सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे की,आरोपींनी रिक्षा व दुचाकीवर येवून मारहाण शिवगाळ करत धमकावून आरोपी महिला शबनम उर्फ शमीन शेख हिने पीडित तरुणीचे हात धरून ठेवले व आरोपी इम्रान , शाहनु ,अकबर ,व बाशीद खान या चौघांनी आळीपाळीने बळजबरीने तिचे विरुद्ध धमकावून बलात्कार केला.या पीडित तरुणीला पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

     या प्रकरणी तपासी अधिकारी पोसई बेंडकोळी यांच्याशी संपर्क साधला असता आरोपींचा शोध सुरू आहे असे त्यांनी सांगितले . घटना गंभीर असल्याचेही ते म्हणाले.आरोपी व फिर्यादी यांच्यात परस्पर विरोधी पोलिसात आधीच्या तक्रारी गुन्हे दाखल आहेत तसाही फिर्यादीत उल्लेख आहे असे सांगण्यात आले.

     या घटनेने मात्र नगर शहरात खळबळ उडाली आहे कारण एका तरुणीवर एका आरोपी महिलेच्या मदतीने चौघांनी सामूहिक बलात्कार करण्याचा अमानवी प्रकार काल दिवसा घडला.