शिवप्रहार न्यूज- पोलीसांना गावठी दारू विकणाऱ्या महिलेने केली धक्काबुक्की;श्रीरामपूर डीवायएसपी कार्यालयातील कर्मचाऱ्याने दिली तक्रार...

शिवप्रहार न्यूज- पोलीसांना गावठी दारू विकणाऱ्या महिलेने केली धक्काबुक्की;श्रीरामपूर डीवायएसपी कार्यालयातील कर्मचाऱ्याने दिली तक्रार...

पोलीसांना गावठी दारू विकणाऱ्या महिलेने केली धक्काबुक्की;श्रीरामपूर डीवायएसपी कार्यालयातील कर्मचाऱ्याने दिली तक्रार...

 देवळाली -देवळाली प्रवरा गावातील इसम बापू भास्कर गायकवाड व मंगल बापू गायकवाड राहणार - देवळाली प्रवरा हे गावठी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने त्यांच्यावर छापा टाकला असता यावेळी आरोपींनी सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना घडली आहे.

         या घटनेबाबत ची अधिक माहिती अशी की,आरोपी यांनी नशाकारक औषधी द्रव्य ,गावठी हातभट्टी हातभट्टीची तयार दारू व गुंगीकारक द्रव्यांच्या सेवनामुळे मानवी जीवितास धोका निर्माण होईल याची जाणीव असताना देखील गावठी दारूची विक्री व गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व नवसागर याच्यासह आरोपी मिळून आले. 

          यातील आरोपी क्रमांक एक बापू गायकवाड हा पोलिसांना पाहताच त्या ठिकाणावरून फरार झाला आणि आरोपी क्रमांक दोन मंगल गायकवाड हिने कारवाईदरम्यान महिला पोलिस कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा करून ,धक्काबुक्की करून ढकलून दिले.

         त्यामुळे या दोघांच्या विरोधात पोलीस शिपाई नितीन शिरसाट ,नेमणूक -उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय,श्रीरामपूर यांच्या तक्रारीवरुन सरकारी कामात अडथळा आणल्याचा व अवैध दारू विक्री बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच आरोपींकडून एक्केचाळीस हजार रुपयांची देशी दारू व नवसागर असे सामान हस्तगत करण्यात आले आहे.

         घटनास्थळी श्रीरामपूर उपविभागाचे डीवायएसपी श्री.संदीप मिटके यांनी भेट दिली.