शिवप्रहार न्यूज - शेतातील सोयाबीन सोंगून चोरून नेले; गुन्हा दाखल

शिवप्रहार न्यूज - शेतातील सोयाबीन सोंगून चोरून नेले; गुन्हा दाखल

शेतातील सोयाबीन सोंगून चोरून नेले; गुन्हा दाखल

श्रीरामपूर(शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहरात महावीरपथ वार्ड नंबर 4 येथे राहणारे शेतकरी दत्तात्रय सावळेराम साबळे यांच्या खानापूर येथील शेती गट नंबर 171 मधील 2 एकर सोयाबीनचे उभे पीक अज्ञात चोरट्याने सोंगून चोरून नेले आहे. या सोयाबीनची किंमत बाजारभावाप्रमाणे 42 हजार रूपये आहे. याप्रकरणी साबळे यांनी श्रीरामपूर तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनी.थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेको बर्डे हे करीत आहेत.

शेतीपीकांना कवडीमोल भाव असताना शेतकऱ्याने मोठ्या कष्टातून उगावलेले सोयाबीनचे पीक चोरून नेल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.