शिवप्रहार न्यूज- वाळू तस्करांवर कारवाई केली म्हणुन ग्रामस्थांनी केला सत्कार…

शिवप्रहार न्यूज- वाळू तस्करांवर कारवाई केली म्हणुन ग्रामस्थांनी केला सत्कार…

वाळू तस्करांवर कारवाई केली म्हणुन ग्रामस्थांनी केला सत्कार…

बोधेगाव- दि 31/1/2022 रोजी दुपारी प्रवरा नदी पत्रात अवैध रित्या वाळू वाहतूक चालू आहे. अशी माहिती महसूल विभागाला मिळताच महसूल विभागाने कार्यवाही केली. काही वाळू वाहतुक करणारे घटना स्थळावरून पळून गेले.पण दोन बैलगाड्या महसूल विभागाला सापडल्या. त्यांच्यावर तहसीलदार-F. R.शेख यांच्या आदेशा नुसार मंडलाधिकारी देवळाली प्रवरा-B.Bजाधव,तलाठी-P.G रामफळे(चांदेगाव), साळवे ,तलाठी (देवळाली प्रवरा),कोतवाल-राजीव चक्रनारायण या सर्वांनी कार्यवाही केली.

        खूप दिवसांनी या भागात कार्यवाही झाली म्हणून सरपंच -संध्या पवार, उपसरपंच- योगिता शिंदे,ऍड-पूजा लावरे, शाम भांड,आरंगळे ,सूर्यकांत शिंदे आणि बोधेगाव नागरिकांच्या वतीने तलाठी रामफळे आणि राजीव चक्रनारायण यांचा सत्कार करण्यात आला.