शिवप्रहर न्युज- श्रीरामपूर तालुक्यात ग्रामपंचायत बंद करण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी दिले निवेदन…

शिवप्रहर न्युज- श्रीरामपूर तालुक्यात ग्रामपंचायत बंद करण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी दिले निवेदन…

श्रीरामपूर तालुक्यात ग्रामपंचायत बंद करण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी दिले निवेदन…

 श्रीरामपूर -श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण या गावामध्ये गावठाण गट वाटप व त्यानंतर घरकुल लाभार्थीचे घरकुल काम होणार होते.

     परंतु त्याची प्रक्रिया बंद झाल्याने समस्त ग्रामस्थांनी आज २६ जानेवारी २०२२ रोजी ग्रामसभेत गावठाण वाटप चा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागत नाही तोपर्यंत भामाठाण ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्यात यावी असे निवेदन ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना दिले आहे.गावठाण वाटपाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागावा यासाठी सर्व ग्रामस्थ एकजुटीने प्रयत्न करीत आहेत.