शिवप्रहार न्यूज- लिट्ल फ्लॉवर स्कूल राहाता तालुक्‍याच्या शैक्षणिक क्षेत्रातील मानाचा तुरा - जेष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे…

शिवप्रहार न्यूज- लिट्ल फ्लॉवर स्कूल राहाता तालुक्‍याच्या शैक्षणिक क्षेत्रातील मानाचा तुरा - जेष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे…

लिट्ल फ्लॉवर स्कूल राहाता तालुक्‍याच्या शैक्षणिक क्षेत्रातील मानाचा तुरा - जेष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे…

  लोणी ( प्रतिनिधी ) येथील डॉ .विखे पाटील फाऊंडेशन संचलित लिट्ल फ्लॉवर स्कूल हे राहाता तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील मानाचा तुरा असल्याचे गौरवोद्गार अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार व संपादक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.मनोजकुमार आगे यांनी काढले . लिट्ल फ्लॉवर स्कूलच्या वतीने ऊर्जा संवर्धन पंधरवाड्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते . या पंधरवाड्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढून ऊर्जा बचत इंधन बचत पाणी बचतीचा संदेश दिला . विजेची बचत हीच विजेची निर्मिती हा दूर दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून वीज बचतीचे संदेश देणारे भिंती पत्रक विद्यार्थ्यांनी बनवून ते आपल्या मित्र परिवारास भेट म्हणून दिलेत . तसेच विद्यार्थ्यांमधील कलाकौशल्यास उत्तेजन मिळावे म्हणून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविण्यात आलेल्या होत्या .

             या टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे भव्य असे प्रदर्शन शाळेमध्ये भरविण्यात आले होते . या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार मनोज कुमार आगे यांच्या शुभहस्ते झाले . यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री मनोजकुमार आगे म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्माणक्षमता असते विद्यार्थी हे गुणसंपन्न असतात .अनेक प्रश्नांच्या कुतूहलातून विद्यार्थी नवनवीन निर्मिती करत असतात . यासाठी विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अध्ययन अध्यापनाची गरज असते आणि असे कृतीयुक्त अध्ययन व अध्यापन राहाता तालुक्यातील नामांकित अशा लिट्ल फ्लॉवर स्कूल मध्ये यशस्वीपणे राबवले जाते . 

          शाळेच्या प्राचार्या सौ.स्वाती खर्डे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबर तसेच नवनिर्मितीस चालना देऊन विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानप्राप्ती कशी होईल यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे नमूद केले .पालकांनी या प्रदर्शनास भेट देऊन आपल्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या खरेदी देखील मोठ्या उत्साहाने केली . 

       संस्थेचे चेअरमन मा.श्री अशोक पाटील विखे साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व प्राचार्या स्वाती खर्डे यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील विद्यार्थी व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी आदींनी प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले .

       लिट्ल फ्लावर स्कूल ही एक विद्यार्थी केंद्रित शाळा असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून सतत कार्यरत असते .माझा पाल्य या शाळेत शिकत असल्याचा मला खूप अभिमान आहे .

असे पालक सुनिल महामिने म्हणाले.