शिवप्रहार न्यूज - खंडणी मागणाऱ्या 'त्या' पत्रकारावर गुन्हा दाखल! पोलीस असल्याचे सांगून टेम्पो पळविला!!
खंडणी मागणाऱ्या 'त्या' पत्रकारावर गुन्हा दाखल! पोलीस असल्याचे सांगून टेम्पो पळविला!!
संगमनेर (शिवप्रहार न्यूज)-संगमनेर शहर परिसरात राहणाऱ्या एका 34 वर्षे वयाच्या विवाहित महिलेला आरोपी शौकत पठाण राहणार-संगमनेर याने मी ह्युमन राईट कमिशन चा पदाधिकारी आहे, मी पुरोगामी पत्रकार संघाचा पत्रकार आहे. माझ्याकडे तुमच्या विरोधात खूप लेखी तक्रारी आहेत, तुम्ही लोकांना खूप त्रास देता, माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग, रेकॉर्डिंग तसेच तुमचे अश्लील फोटो आहे. तुम्ही मला ६ लाख रुपये द्या अन्यथा तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करील असे म्हणत ६ लाखाची खंडणी मागितली. वरील प्रमाणे काल पीडित महिलेने संगमनेर शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी शौकत पठाण या पत्रकाराविरुद्ध भादवी कलम 384 प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई पवार हे पुढील तपास करीत आहे. पत्रकार व हयुमन राईट तसेच अनेक ठीकाणी तोतया पत्रकार खंडणी उकळतात अशी चर्चा या गुन्ह्यानंतर सुरु झाली आहे.
दुसऱ्या घटनेत संगमनेर शहरात मालपाणी कारखान्याजवळ काल सायंकाळी 7:45 च्या सुमारास टेम्पो घेऊन चाललेला ड्रायव्हर शामू रज्जू गौड राहणार-मुंबई याची गाडी चौघा अज्ञात आरोपींनी अडवली. आम्ही पोलीस आहोत, तुझ्या गाडीत गांजा आहे, तुझी गाडी तपासायची आहे असे म्हणत त्याचा टेम्पो घेऊन चौघे आरोपी पळून गेले. याप्रकरणी शामू गौड यांनी संगमनेर शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून अज्ञात तोतया चार पोलीस सांगणाऱ्या आरोपींविरुद्ध भादवी कलम 420, 170, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा संगमनेर शहर पोलीस कसून तपास घेत आहे. मालपाणी कारखान्या जवळ भरस्त्यावर हा प्रकार घडला.