शिवप्रहार न्यूज- दीपकचा शोध लागण्यासाठी CID चौकशी करा- भाजप आ.राणे…
दीपकचा शोध लागण्यासाठी CID चौकशी करा- भाजप आ.राणे…
श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील आदिवासी समाजातील तरुण दीपक बर्डे हा गेल्या अकरा दिवसापासून बेपत्ता आहे.या प्रकरणात आरोपींना अटक करून सात दिवस झाले तरी पोलिसांकडून दीपक बर्डे याचा शोध लागलेला नाही.
या घटनेच्या निषेधार्थ काल भाजप आमदार नितेश राणे व माजी मंत्री आमदार अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामपूर शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय,श्रीरामपूर येथे मोर्चा आल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर व उपाधिक्षक संदीप मिटके यांनी या प्रकरणाचा तपास योग्य रीतीने व वेगवान पद्धतीने सुरू असल्याचे सांगून गोदावरी नदी दीपक चा घातपात करून टाकल्याची आरोपींनी कबुली दिली आहे.त्या दिशेने कसून तपास चालू असल्याचे मोर्चेकरांना सांगितले.
दरम्यान या मोर्चाला आदिवासी संघटना व समाज बांधवांसह भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.