शिवप्रहार न्यूज- महाराष्ट्रात 23 ठिकाणी होणार वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र;जिल्ह्यात श्रीरामपूरला मान…
महाराष्ट्रात 23 ठिकाणी होणार वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र;जिल्ह्यात श्रीरामपूरला मान…
श्रीरामपूर - महाराष्ट्र शासनाने दरवर्षी होणारे रस्ते अपघात कमी करण्यासाठी व अपघातात बळी जाण्याचे प्रमाण कमी व्हावे याकरिता वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्र स्थापन करण्यास नुकतीच मान्यता दिली आहे.ही केंद्रे महाराष्ट्रातील मुंबई,नागपूर,संभाजीनगर,नांदेड,पुणे यासारख्या 23 महत्त्वाच्या शहरांमध्ये स्थापन करण्यात येणार आहे.या 23 शहरांमध्ये नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहराचा समावेश असल्याची माहिती समजत आहे.
या सर्व केंद्रांसाठी एकूण साडेचारशे कोटी रुपयांचा निधी शासनाकडुन मिळणार आहे.या केंद्रांवर गाडीची अत्यंत काटेकोरपणे फिटनेस चाचणी करण्यात येईल.ज्यामध्ये गाडीचे लाईट, ब्रेक,टायर,इंजिन यांची संपूर्णपणे सखोल तपासणी केली जाणार.
महाराष्ट्रातील 23 प्रमुख शहरांमध्ये श्रीरामपूरला हा मान मिळाला आहे.या बाबीमुळे श्रीरामपूरचे नगर जिल्ह्यातील महत्त्व व भावी जिल्ह्याचे ठिकाण म्हणून दावा पुन्हा एकदा सरकारी पातळीवर अधोरेखित झाला आहे.