शिवप्रहार न्युज - वादापेक्षा मनाची शांतता महत्वाची: प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

वादापेक्षा मनाची शांतता महत्वाची: प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे
अहिल्यानगरः आपल्या दुःखापेक्षा इतरांचे दुःख पक्षकारांनी समजून घेणे महत्वाचे आहे. यंत्रणा आपल्यासाठी आहे, न्यायासाठी आहे. वादापेक्षा मनाची शांतता महत्वाची आहे. त्यामुळे आपली प्रकरणे सामजस्यांने मिटवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर बार आणि सेंट्रल बार असोशिएशन, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये करण्यात आले. राष्ट्रीय लोकन्यायालयाचे उद्घाटन रोपट्यास पाणी घालून पक्षकार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा न्यायाधीश (क्रमांक एक) सी. एम. बागल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. भाग्यश्री का. पाटील, जिल्हा सरकारी वकील ॲड. सतिश पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा बांगर आणि न्यायिक अधिकारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.न्या. भाग्यश्री पाटील यांनी प्रस्ताविक केले. ॲड. भूषण बऱ्हाटे, ॲड. संजय पाटील, ॲड. पिंटू पाटोळे, ॲड. स्वाती नगरकर, ॲड. स्वाती पाटील, ॲड. आशा गोंधळे, ॲड. राजाभाऊ शिर्के, ॲड. अनिल अंधारे उपस्थित होते.
दोन्ही बारचे सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. ॲड. नितीन खैरे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. वृषाली तांदळे यांनी आभार मानले.