शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूर तालुक्यात वाळू ट्रॅक्टर पकडला...
श्रीरामपूर तालुक्यात वाळू ट्रॅक्टर पकडला...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)-संपूर्ण जिल्ह्यात वाळूबंदी असताना आज श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण परिसरात ट्रॅक्टरमधून गोदावरी नदी पात्रातून वाळू चोरून नेली जात असल्याची गुप्त माहिती तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सपोनि ज्ञानेश्वर थोरात यांना मिळाली.त्यांनी तातडीने पोलीस पथक पाठविले.
तेव्हा आवलगाव ते खानापूर रस्त्यावर भामठाण शिवारात निळ्या रंगाचा सोनाली कंपनीचा ट्रॅक्टर व विना नंबरची ट्रॉली त्यात गोदावरी नदी पात्रातून चोरलेली एक ब्रास वाळू मिळून आली.पोलीस नाईक प्रशांत रणवरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी कलीम मेहबूब पठाण ,राहणार -श्रीरामपूर व भगवान शामराव बनसोडे ,राहणार- भामाठाण या दोघांविरुद्ध वाळू चोरी व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस पुढील तपास करीत आहे.
श्रीरामपूर शहर व तालुक्यात वाळू तस्करी पूर्ण बंद असून आज वाळू वाहतुकीची खबर मिळताच तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपीला पकडून गुन्हा दाखल केला. या घटनेने वाळू चोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.