शिवप्रहार न्यूज- दमदार नामदार प्राजक्तदादा तनुपरेंनी राहुरी येथील रस्त्यांसाठी जवळपास ०४ कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला...
दमदार नामदार प्राजक्तदादा तनुपरेंनी राहुरी येथील रस्त्यांसाठी जवळपास ०४ कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला...
राहुरी(शहर प्रतिनिधी) -
राहुरी विधानसभा मतदार संघातील रस्ते विकास कामांसाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय रस्ते महामार्ग निधीतुन ३ कोटी ९४ लाख १३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे राज्यमंत्री नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी सांगितले.
राहुरी तालुक्यातील खरशिंदे ,वरशिंदे,ताहाराबाद,राहुरी,मानोरी. मांजरीअंतगर्त रस्ता ,राहुरी नगर -मनमाड पाण्याची टाकी रस्ता ते राहुरी स्टेशन रस्ता कॉंक्रीटीकरण करणेसाठी रु.३ कोटी ९४ लाख १३ हजार निधी उपलब्ध झालेला आहे. सदर रस्ता हा वरदळीचा असल्याने तालुक्याचे ठिकाणी येणारा रस्ता मजबूत होणेसाठी सदरचा निधी प्राप्त झाल्याने परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.