शिवप्रहार न्यूज- नगरमध्ये चोरी करताना श्रीरामपूरच्या आरोपीला पकडले...

शिवप्रहार न्यूज- नगरमध्ये चोरी करताना श्रीरामपूरच्या आरोपीला पकडले...

नगरमध्ये चोरी करताना श्रीरामपूरच्या आरोपीला पकडले...

 नगर - श्रीरामपूर शहरातील बजरंग चौक भागात राहणाऱ्या सोमनाथ जीभाऊ डावरे ,वय ३२ या आरोपीला नगर तालुक्यातील शिंगवे नाईक या गावांमध्ये शेतातील पानबुडी मोटरची चोरी करताना स्थानिक नागरिकांनी पकडले.यावेळी सोमनाथचे इतर साथीदार पसार झाले.

         या प्रकरणी दत्तात्रेय दोंड, राहणार -शिंगवे नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इतर आरोपींचा शोध घेण्याबाबत पुढील तपास चालू आहे.