शिवप्रहार न्यूज-लिपिक अशोक मरकड याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दुसऱ्यांदा कारवाई
काटेपिंपळगाव/ प्रतिनिधी
गंगापूर तहसिल मधील महसूल विभागात लिपिक म्हणून कार्यरत असलेला कर्मचारी अशोक मरकड याने दिनांक 9 एप्रिल रोजी तहसीलदार अविनाश शिंगटे याच्या सांगण्यावरून लिपिक अशोक मरकड याने आपेगाव येथील शेतकऱ्याकडून 125000 लाचेच्या मागणी पैकी पैकी पहिला हप्ता म्हणून 70 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले औरंगाबादला लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली, त्यामुळे जिल्ह्यामध्ये भ्रष्ट धिकार्यांचे धाबे दणाणले आहे गंगापूर तहसील कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे नुकतीच काही दिसत दिवसापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रजिस्ट्री ऑफिस मधील दुय्यम निबंधक औदुंबर लाटे याला लाच घेताने रंगेहात पकडले होते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गंगापूर तहसील मध्ये पंधरवड्यात दुसऱ्यांदा ही कारवाई केली आहे गंगापूर तहसील मध्ये कुठल्याही कामासाठी आल्यावर कुठल्याही कामासाठी दलालांमार्फत अधिकारी व तहसील मधील कर्मचारी पैशाची मागणी करतात त्यामुळे सामान्य माणसाचा वेळ व पैसा वाया जात आहे श्री मरकड गंगापूर तहसील मध्ये गेल्या काही वर्षापासून कार्यरत आहे कुठल्याही क्रमाचे कर्मचाऱ्याला एका मुख्यालयात एका ठिकाणी तीन वर्षाच्या वर राहता येत नाही मात्र अधिकारी तीन वर्षाच्या नंतर नंतरही त्याच ठिकाणी राहण्याची मागणी जिल्हाधिकार्यांना करतात व आपली मागणी पदरात पाडून घेतात श्री. मरकड तीन वर्षापेक्षा जास्त काळापासुन गंगापूर तहसील मध्ये कार्यरत होते विशेष म्हणजे लिपिक म्हणून कार्यरत असताना श्री मरकड यास संगणकाचे कुठलेही ज्ञान नव्हते गंगापूर तहसील चे तत्कालीन तहसीलदार डॉक्टर अरुण जराड यांनी मरकड याच्यासह सहा कर्मचाऱ्यांची बदली करण्याची मागणी गेल्या वीस महिन्यांपूर्वीच केली होती मात्र मरकड याने जिल्हाधिकाऱ्यांना विनंती द्वारे आपली बदली रद्द करण्याची मागणी केली होती संगणकाचा पुरेसे ज्ञान नसल्यामुळे मरकड याच्यामुळे तहसीलमध्ये कामकाजात व्यत्यय आला होता मात्र संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नसतानाही व तसेच साधा एमएस-सीआयटी कोर्स देखील मरकड यांचा झालेला नव्हता प्रशासनातील भ्रष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादावर मरकड आपल्या पदावर कायम राहिले महसूल विभागातील बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या लोकांकडून हप्ते वसुली करणे व तसेच सुनावणीच्या प्रकरणात पक्षकाराकडून बेकायदेशीर रक्कम घेऊन निर्णय देणे, एकंदरीत गंगापूर तहसिल भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे त्यामुळे गंगापूर येथे बदली करण्यासाठी शासकीय कर्मचारी व अधिकारी उत्सुक असतात या भ्रष्टाचाराकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करून यांना सहकार्य करतात तालुक्यातील पुरवठा विभागातून मागील वर्षातून तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात मायाजाल गोळा केलेला आहे व तसेच गंगापूर तहसील मधील संजय गांधी व श्रावणबाळ योजना विभाग यात बोगस लाभार्थी अंतर्भूत करून त्यांच्याकडूनही भ्रष्टाचारातुन पैसे उकळलेले आहे त्यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्यांची संपत्तीची खुली चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही असा प्रश्न गंगापुर तालुक्यातील नागरीकातून होत आहे गंगापुर तालुक्यातील शिवना नदी हा वाळूचा मोठा पट्टा आहे वाळू पट्ट्यातून लाखो रुपयांचा महसूल शासनाचा बुडालेला आहे या यास सर्वस्वी तहसीलदार अविनाश शिंगटे जबाबदार होते या अवैध वाळू उपसा बाबत गंगापूर तालुक्यातील अनेक पक्ष सामाजिक संघटना यांनी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांना निवेदनाद्वारे अवैध वाळू उपसा थांबावा यासाठी मागणी केली होती अनुसरून विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांनी गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात उपविभागीय अधिकारी वैजापूर व तसेच तहसीलदार गंगापूर यांना पथक नेमण्याचे आदेश दिले होते व तसेच पथकही नेमण्यात आले मात्र या पथकातील सर्व जबाबदार अधिकाऱ्यांनी वाळू तस्करांना अभय दिले ,त्यांच्याकडून हप्तेखोरी केली, सर्वसामान्य गोरगरीब नागरिक आपलं काम घेऊन तहसील मध्ये आल्यानंतर त्यांना आपले काम होण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे मोजावे लागतात अधिकाऱ्यांना कामासाठी पैसे दिले नाही तर अधिकारी त्यांना खोटे बोलून पुढील दिवसाचा वायदा करतात व पुढील तारखेला या असे सांगतात त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाया जातो नागरिकांचे खूप प्रमाणात आर्थिक शोषण गंगापूर तहसील मध्ये होत आहे.