शिवप्रहार न्यूज- कॉलेज जवळ थांबलेल्या दोघांनी पोलीस निरीक्षकांना केले जखमी !
कॉलेज जवळ थांबलेल्या दोघांनी पोलीस निरीक्षकांना केले जखमी !
नेवासा ( शिवप्रहार न्यूज ) जिल्ह्यात सध्या विद्यार्थिनींची छेडछाड रोखण्यासाठी कॉलेज परिसरात पोलीस यंत्रणा सतर्क झालेली असताना काल नेवासा येथे ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या गेट जवळ दोन अनोळखी तरुण विना नंबरच्या दुचाकीसह थांबून होते.यावेळी पेट्रोलिंग करणारे नेवासा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक विजय करे हे गाडीतून जात असताना त्यांनी या विना नंबरच्या दुचाकीवाल्यांना हटकले व तुम्ही येथे काय करता तुमचे नाव काय ? असा जाब विचारला.
तेव्हा आरोपींनी दुचाकी भरधाव वेगात सुरू करून चालून पोलीस निरीक्षक करे यांना धक्का दिला ते खाली पडून जखमी झाले.दुसऱ्या पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी फरार झाले. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पोलीस हेडकॉन्स्टेबल दिलीप रामा कुराडे यांच्या फिर्यादीवरून विना नंबरच्या दुचाकीवर फरार आरोपी आरमान व अरबाज ,दोघे राहणार- नेवासा यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा व इतर कलमान्वये काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी डीवायएसपी सातव यांनी भेट दिली.पोलीस निरीक्षक करे यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपी आरमान व अरबाज या दोघा आरोपींचा शोध चालु आहे. सपोनि भटेवाल हे पुढील तपास करीत आहे.
कॉलेज जवळ थांबून हे आरोपी विद्यार्थिनींची छेडछाड करण्याच्या तयारीत होते असे आजूबाजूच्या लोकांनी सांगितले.हे दोघे तरुण कॉलेजचे विद्यार्थी आहेत किंवा नाही याचाही शोध सुरू असून दोघे फरार झाले आहेत.या घटनेने पोलिसांनाच आता कठोर भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचे मत विद्यार्थी,विद्यार्थिनी,पालक व शिक्षक यांनी व्यक्त केले आहे.