शिवप्रहार न्युज - रस्तालूट करणारे श्रीरामपूर, राहाता, राहुरीचे चौघे पकडले; स्कोडा कार जप्त

रस्तालूट करणारे श्रीरामपूर, राहाता, राहुरीचे चौघे पकडले; स्कोडा कार जप्त
लोणी (शिवप्रहार न्युज) - लोणी पोलीस स्टेशन हरीत दिवसा रस्तालुट करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांन यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० ते १.४५ दरम्यान सोनगाव, ता. राहुरी येथील होलसेल व रिटेल किराणा व्यापारी गणेश नंदलाल दरक यांचेकडील एक्सल चारचाकी मालवाहू वाहन क्र. एमएच ०५ डिके ३४२० या वाहनावरील चालक विकी अशोक पिंपळे, वय १९, रा.सोनगाव, ता. राहुरी हा श्रीरामपूर एमआयडीसी येथून सोयाबीन तेलाचे डबे आणण्यासाठी रोख रक्कम रु.३,१०,८९० वाहनाच्या केबीनमधील डिक्कीत घेवून जात असताना त्याचे वाहनाचा एक पांढरे रंगाचे बिगर नंबरच्या स्कोडा कंपनीच्या कारमधील दोघा अनोळखी आरोपींनी पाठलाग करून बाभळेश्वर शिवार, ता. राहाता येथे बाभळेश्वर ते श्रीरामपूर जाणाऱ्या रस्त्यावर विद्या विकास शाळेचे पुढे मालवाहू वाहनास कार आडवी लावून रस्ता अडवून मालवाहू वाहनावरील चालकास तू आमचे कारला कट का मारला, अशी दमदाटी करून त्यास मारहाण करण्याची भिती दाखवून मालवाहू वाहनाच्या ड्रायव्हरकडून जबरदस्तीने चावी घेवून वाहनाचे केबीनमधील डिक्की उघडून त्यातील रोख रक्कमसह वाहन चालकाचा मोबाईल फोन असा एकूण ३,१८,८९० रूपयांचा ऐवज काढून चोरून नेला होता. याप्रकरणी मालवाहू वाहनावरील चालक अशोक पिंपळे याने दि. १ फेब्रुवारी रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी चोरट्यांविरूद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हयाचा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. समाधान पाटील, पोउनि योगेश शिंदे व उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांच्या तपास पथकातील पोलीस तपास करीत असताना गुन्हयातील घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याआधारे गुन्हयातील पांढन्या रंगाच्या स्कोडा कंपनीच्या कारचा तपास चालू असताना गुप्ता बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सदरचे वाहन हे ऋतुराज उर्फ अमोल अविनाश कुंदे, वय १९, रा. एकरूखे, ता. राहाता हा वापर करीत आहे. पोलीस पथकाला माहिती मिळाल्याने नमूद वाहन ब त्यावरील चालक ऋतुराज उर्फ अमोल अविनाश कुंदे यास लोणी व राहाता पोलीस स्टेशनचे स्टाफचे मदतीने राहाता शिवारातून ताब्यात घेवून त्याचेकडील सदर गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने व त्याचे स्वतः व त्याचे साथीदार उमेश तान्हाजी वा यदंडे, रा. एकरूखे, ता. राहाता, दिनेश बाळासाहेब जाधव, वय-२१, रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर, तौफीक युसूफ पिंजारी, वय-२५, आदित्य विलास ब्राम्हणे, वय-२२, रा.धानोरे, सोनगाव, ता. राहुरी यांचे सोबत मिळून गुन्हयाचा कट करून नमूद गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर गुन्हयात सहभागी असलेले आरोपांपैकी ४ आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली असून गुन्हयात आरोपींनी वापरलेली पांढऱ्या रंगाची स्कोडा रॅपीड कार व काही रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच गुन्हयातील आरोपी उमेश तान्हाजी वायदंडे हा अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यात येत असून गुन्हयातील उर्वरीत रोख रक्कम जप्त करण्याची कारवाई चालू आहे.
सदरचा गुन्हा आरोपींनी अत्यंत चलाखीने गुन्हयाचा कट रचून केला आहे. सदर गुन्हयातील अटक आरोपी तौफीक युसूफ पिंजारी हा किराणा व्यापारी गणेश नंदलाल दरक यांचे दुकानामध्ये काम करणारा मॅनेजर असून त्याने घटनेच्या दिवशी इतर आरोपींना सदर रोख रक्कम ठेवलेल्या मालवाहू वाहनाचे फोटोग्राफ पाठवून वाहन सोनगाव येथून रोख रक्कम घेवून लोणी-बाभळेश्वर मार्गे श्रीरामपूर दिशेने तेलाचे डबे घेण्यासाठी निघाले असल्याची माहिती दिली होती. त्या आधारे आरोपींनी मालवाहू वाहन अडवून सदरचा गुन्हा घडवून आणला असल्याचे तपासात पुढे आले आहे.