शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस निलंबीत…
श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस निलंबीत…
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांना निलंबीत करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या वृत्तास जिल्हापरिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोहीनकर यांनी दुजोरा दिला आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, श्रीरामपूर पंचायत समितीत कार्यरत असणारे गटविकास अधिकारी धस यांच्या कामकाजाबाबत अनेक आक्षेप आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भात काही सदस्यांनी तक्रारी केल्या होत्या.
धस यांच्या कार्यकाळातील कामकाज आणि तक्रारीबाबतचा चौकशी अहवाल पाठविण्यात आल्यानंतर काल मंत्रालयातून धस यांच्या निलंबनाचा आदेश ग्रामविकास खात्यातून आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोहीनकर यांनी दिली.
श्रीरामपूर पंचायत समितीच्या पदावर कार्यरत असणाऱ्या गटविकास अधिकाऱ्याचे अशाप्रकारे निलंबन होण्याची नजीकच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे.