शिवप्रहार न्यूज- शॉर्ट सर्किटमुळे श्रीरामपूर तालुक्यात दोन शेतकऱ्यांचा ऊस जळाला…
शॉर्ट सर्किटमुळे श्रीरामपूर तालुक्यात दोन शेतकऱ्यांचा ऊस जळाला…
श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक शिवारात असणाऱ्या गट नंबर 36 व गट नंबर 37 मधील उभे ऊस पीक काल लाईटच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून जळाल्यामुळे उसाचे व ठिबक पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले.
लताबाई बाळकृष्ण खोसे व बाळकृष्ण गोविंद खोसे यांच्या मालकीचे सदरचे एकूण चार एकर उसाचे क्षेत्र होते.दरम्यान उसाला लागलेली आग विझवण्यासाठी अशोक सहकारी साखर कारखान्याची अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल झाली होती.