शिवप्रहार न्यूज- गणवेशासाठी विद्यार्थिनींचा दोन शिक्षकांकडून विनयभंग ! तर विद्यार्थिनी समोर नग्न होणाऱ्या शेखला अटक…

गणवेशासाठी विद्यार्थिनींचा दोन शिक्षकांकडून विनयभंग ! तर विद्यार्थिनी समोर नग्न होणाऱ्या शेखला अटक…
शिर्डी ( शिवप्रहार न्युज ) -शिर्डीत जिल्हा परिषदेच्या शाळेत सिगारेट प्यायचे का ? म्हणत शिक्षकाने विद्यार्थीनिला धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विद्यार्थीनीचा विनयभंग केला तर दुसऱ्या शिक्षकाने गणवेश मागायला आलेल्या विद्यार्थीनींना पुर्ण कपडे काढून नवीन गणवेश घालुन दाखवा असे सांगीतले. तेव्हा विद्यार्थीनीनी नकार दिला असता नराधम शिक्षकाने विद्यार्थीनिला धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला.या घटनेने विद्यार्थीनी व पालकात एकच खळबळ उडाली असून शिक्षकांना बेदम चोप देण्यात आला आहे.आरोपी शिक्षक संजय थोरात व राजेन्द्र थोरात यांना शिर्डी पोलिसांनी अटक केली असून विनयभंग व पोस्को कलमाने गुन्हा दाखल केला आहे.पोनि गुलाबराव पाटील पुढील तपास करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत शिर्डी परिसरत सोमैया कॉलेज मागे भर दिवसा सकाळी ९.३० च्या सुमारास १७ वर्षाच्या कॉलेज विद्यार्थीनी समोर दुचाकी थांबवून आरोपी असिफ मकबुल शेख याने पॅन्ट काढून नग्न होवून या इकडे या असे म्हणत विनय भंग केला.याप्रकरणी आरोपी असिफ शेख रा- इस्लामनगर जळगाव, हल्ली राहणार -शाम जगताप यांची खोली, शिर्डी याच्याविरुद्ध विनयभंग पोस्को व अनुसुचित जाती जमाती अत्याचार कलमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी आसिफ शेखला शिर्डी पोलीसांनी अटका केली आहे.डीवायएसपी सातव हे पुढील तपास करीत आहेत.जळगांव जिल्ह्यातील आरोपी शेख शिर्डीत खोली घेवून राहातो व नग्न होवून विद्यार्थिनींचा विनयभंग करतो या प्रकाराने शिर्डी व परिसरातील पालक वर्गात खळबळ उडाली आहे .