शिवप्रहार न्यूज- आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 22 गोवंशांची कत्तलीतुन मुक्तता...
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 22 गोवंशांची कत्तलीतुन मुक्तता...
संगमनेर- संगमनेर शहर पोलिसांनी जमजम कॉलनीतील बेकायदेशीररित्या चालणाऱ्या कत्तलखान्यावर छापा टाकून कत्तलीचा उद्देशाने आणलेल्या बावीस गोवंशाची कत्तलीतून मुक्तता केली आहे.एकूण चार लाख सात हजार रुपये किमतीचे हे गोवंश असून पोलिसांनी पंचनामा करून सदर गोवंशांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस निरीक्षक श्री.मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बर्डे यांनी फिर्याद दिल्याने आरोपी अब्दुल वाहिद करीम कुरेशी,राहणार -जमजम कॉलनी, संगमनेर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने परिसरामध्ये या घटनेची मोठी चर्चा झाली.