शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर पोलीसांनी श्रीरामपूर शहरात गुटखा पकडला...
श्रीरामपूर पोलीसांनी श्रीरामपूर शहरात गुटखा पकडला...
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 मधील काजी बाबा रोडवर “कादर” नावाच्या एका इसमाला गुटखा बाळगला म्हणुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी श्री.साळवी,श्री.गोसावी,श्री.पोकळे यांच्या पथकाने आज दुपारी एक वाजताच्या सुमारास पकडले. कादर हा काजी बाबा रोडवरील त्याच्या घराजवळ एकूण जवळपास दहा हजार रुपयांच्या गुटख्यासह मिळुन आला.कादर कडुन पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्यामध्ये विमल आणि आर एम डी कंपनीचा गुटखा याचा समावेश आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनने पुढील कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. तरी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्रतिसाद मिळताच पकडलेला आरोपी कादर याच्यावर गुन्हा दाखल करण्याची पोलिसांनी तजवीज ठेवली आहे.
राज्यभर शासने गुटखा बंदी केलेली असतांना काही महिन्यापूर्वी श्रीरामपूर शहर पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा पकडला होता आणि ते प्रकरण जिल्हाभर गाजले होते. त्यानंतर आता पुन्हा श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 मध्ये 10 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आज रोजी पकडण्यात आला आहे. बंदी असतांना गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याने या घटनेची देखील चांगलीच चर्चा होत आहे.