शिवप्रहार न्यूज- मापारींची 10 दिवसांपूर्वी चोरलेली पल्सर आज सायंकाळी अशोकनगर मध्ये एका बंद गाळ्यात मिळून आली…

मापारींची 10 दिवसांपूर्वी चोरलेली पल्सर आज सायंकाळी अशोकनगर मध्ये एका बंद गाळ्यात मिळून आली…
श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर या गावांमधून करण अनिल मापारी या तरुणाची लाल काळया रंगाची पल्सर मोटरसायकल क्रमांक एम.एच.17 सी.एच 5779 ही मोटर सायकल दहा दिवसांपूर्वी त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात मोटारसायकल चोरीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
दरम्यान आज दिनांक 12 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास करण अनिल मापारी यास त्यांची पल्सर मोटर सायकल अशोकनगर गावातीलच कारखाना रोड भागातील एका गाळ्यामध्ये लपवून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आली.याप्रकरणी मापारी यांनी श्रीरामपूर पोलीस स्टेशनला कळविले असून श्रीरामपूर शहर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.