शिवप्रहार न्यूज- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी काटेपिंपळगाव येथे ध्वजारोहण संपन्न...

शिवप्रहार न्यूज- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी काटेपिंपळगाव येथे ध्वजारोहण संपन्न...

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी काटेपिंपळगाव येथे ध्वजारोहण संपन्न...

प्रतिनिधी (गंगापूर) अप्पासाहेब फिंपाळे.

गंगापुर तालुक्यातील काटेपिंपळगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय समोर ध्वजारोहण उपसरपंच प्रकाश फिंपाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खरेदी-विक्री संघाचे सभापती सुभाष आबा धोत्रे,सरपंच श्रीमती मनिषाताई कृष्णाकांत व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

       या कार्यक्रमाचे औचित्य साधून सेवा संस्थेच्या वतीने काटे पिंपळगाव येथील 50 महिलांना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.त्याच प्रमाणे औषध फवारणी साठी पी पी किट वाटप करण्यात आले.यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन नानाभाऊ धनाड,उपसरपंच प्रकाश फिंपाळे,पोलीस पाटील विश्वनाथ धोत्रे ,अण्णा देवराव सोनवणे,अण्णा असाराम सोनवणे,बबन शेळके,भाऊराव पवार,अशोक राऊत,हौशीराम मोरे,कैलास धोत्रे,नवनाथ थोरात,हरी राऊत,मयुर फिंपाळे व तलाठी चव्हाण आप्पा ग्रामपंचायत कर्मचारी रुस्तुम राऊत,नरेश गायकवाड,योगेश शेळके,सेवा रुढी संस्थेचे सुनील चव्हाण,सुभाष चव्हाण,अभिजीत पैठणे आदीसह शेतकरी महिला ग्रामस्थांची उपस्थिती होती.

        यावेळी सूत्रसंचालन शेळके सर यांनी केले तर आभारप्रदर्शन आप्पासाहेब फिंपाळे यांनी केले.