शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरातील जिम मालकावर बलात्काराचा गुन्हा;जिममध्ये सुद्धा केला अत्याचार …

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरातील जिम मालकावर बलात्काराचा गुन्हा;जिममध्ये सुद्धा केला अत्याचार …

श्रीरामपूर शहरातील जिम मालकावर बलात्काराचा गुन्हा;जिममध्ये सुद्धा केला अत्याचार …

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - लग्न झालेले असतानाही शहरातील एका तरुणीस फसवून लग्नाचे आमिष दाखवून त्या तरुणीवर गेली दोन वर्षे त्यांच्या जिममध्ये व पुणे येथे हॉटेलमध्ये नेवून अत्याचार केला. लग्न करण्यास नकार देवून मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. 

      या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         सन २०२० पासून ते दि. ८ डिसेंबर २०२२ पावेतो युवराज विजय शिंदे, रा. मेनरोड, श्रीरामपूर याने त्याचे लग्न झालेले असताना देखील आपण लग्न करु, एकत्र राहु असे म्हणून तरुणीसोबत वेळोवेळी पुणे येथील हॉटेलवर तसेच त्याचे पुणे येथील फ्लॅटवर व त्याचे सुर्या जिममध्ये बळजबरीने शारिरीक संबध ठेवले. तसेच दत्त मंदिर येथे माझ्या केसात सिंदूर भरुन, गळ्यात मंगळसुत्र बांधुन, खोटे लग्न करुन तरुणीची फसवणूक केली आहे. तरुणीने त्याला लग्नाबाबत विचारले असता त्याने तरुणीस शिवीगाळ करून मारहाण केली. तुला व तुझ्या भावाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. तुझ्या सोबत लग्न करणार नाही. मी तुझ्याकडुन माझा फायदा करुन घेतला आहे, असे त्याने सांगितल्याने तरूणी तेथेच चक्कर येवून पडली. 

     त्यानंतर ती श्रीरामपूर येथे आल्यावर तिने वेळोवेळी फोन करुन आपण लग्न करु असा हट्ट धरला असता त्याने तरुणीला बदनामी करण्याची व मारण्याची धमकी देवुन तिचे फोन ब्लॉक करुन टाकले.

दि. ०८ डिसेंबर २०२२ रोजी युवराज शिंदे याचे घरी बाटाशोरुमच्या वरच्या मजल्यावर,मेनरोड,श्रीरामपूर येथे तरूणी गेली असता तेव्हा तेथे काम करणाऱ्या एका मुलाकडुन समजले की,युवराज याचे लग्न झाले असून त्याला दोन मुले देखील आहे. तेव्हा युवराज याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने तरूणी बेलापूर येथील प्रवरा नदीच्या पुलावरुन चढुन आत्महत्या करत असतांना तेथील नागरिकांनी तरूणीस पकडले. तेव्हा चक्कर येवुन ती खाली पडली असता उपचारासाठी तिला साखर कामगार हॉस्पीटल श्रीरामपूर येथे दाखल केले.

      या प्रकरणी श्रीरामपूर शहर ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी युवराज शिंदे याचेविरुद्ध भादंवि कलम ३७६, ४२०, ३३४, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोनि.हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.