शिवप्रहार न्यूज- बाटलीत पेट्रोल दिले नाही म्हणून पेट्रोल पंप  कर्मचाऱ्यास चार जणांनी केली रॉडने मारहाण

शिवप्रहार न्यूज- बाटलीत पेट्रोल दिले नाही म्हणून पेट्रोल पंप  कर्मचाऱ्यास चार जणांनी केली रॉडने मारहाण

बाटलीत पेट्रोल दिले नाही म्हणून पेट्रोल पंप  कर्मचाऱ्यास चार जणांनी केली रॉडने मारहाण....

शिर्डी- सावळीविहीर येथील श्री.साईबाबा सर्विस सेंटर पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी गणेश गोविंद भवर, वय 21 ,धंदा-नोकरी ,राहणार-सावळीवीहिर  हे  पंपावर ड्युटी करत असताना तेथे आरोपी ०१) संदीप रमेश विघे,०२)सचिन रमेश विघे,०३) विशाल अशोक आगलावे,०४) प्रशांत पालकर, सर्व राहणार- सावळीवीहीर हे आले आणि आम्हाला बाटलीमध्ये पेट्रोल दे असे म्हणू लागले. त्यावर श्री.भवर यांनी पेट्रोल फक्त अत्यावश्यक वाहनासाठी देण्याची परवानगी आहे व बाटलीमध्ये पेट्रोल देण्यास मालकाने मनाई केली आहे असे त्या ०४ जणांना सांगितले. त्याचा राग चौघांना आला आणि त्यांनी हातातील लाकडी दांड्याने व लोखंडी रॉडने भवर यांच्या हातावर, पायावर ,पोटरीवर व डोक्यात मारहाण केली. म्हणून भवर यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 107/21 भादवि कलम 324, 323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री.लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्री.भुतांबरे हे करीत आहेत.