शिवप्रहार न्यूज- पाटा जवळून सूर्यवंशी यांची मोटर सायकल गेली चोरीला…
पाटा जवळून सूर्यवंशी यांची मोटर सायकल गेली चोरीला…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील एमएस डिझाईन ऑफिस समोरून ,साधना केक शॅाप,वार्ड नंबर सात जवळ या ठिकाणाहून मंगेश केदार सूर्यवंशी,वय 24 वर्ष ,राहणार- विजय हॉटेल जवळ, वार्ड नंबर 7,श्रीरामपूर यांच्या मालकीची होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल एम एच 12 ईआर 1259 ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा काल रोजी दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास पोलिस नाईक वांढेकर हे करीत आहेत.