शिवप्रहार न्यूज-लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार;श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याच्या कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार;श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याच्या कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल...
श्रीरामपूर - वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीवर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई तुळशीराम उर्फ राजू पोपट वायकर याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर श्रीरामपूर,शिर्डी व बाभळेश्वर येथे वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
अधिक माहिती अशी की, आरोपी तुळशीराम वायकर याचे ४-५ वर्षापूर्वी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणी सोबत प्रेमसंबंध जुळले. या नंतर आरोपीने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत वारंवार शरीरसंबंध ठेवले.त्यातून ही तरुणी गर्भवती झाली.आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडून तिचा गर्भपात देखील केला.
तसेच या प्रकाराची माहिती तुळशीराम वायकर याच्या घरी सांगण्यासाठी ही तरुणी गेली असता तिला समजले कि,तुळशीराम याचे पहिलेच लग्न झाले असून तो विवाहित आहे.यावेळी तुळशीरामच्या आईने,पत्नीने या पिडीत भावी डॅाक्टर तरुणीला जातीवाचक शिवीगाळ केली.
या सर्व प्रकारावरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तुळशीराम ऊर्फ राजू पोपट वायकर,सईबाई वायकर,हिराबाई वायकर यांच्या विरुद्ध भादवि कलम 376 (2) (एन)313,420,417 इतर व अनुसूचित जाती-जमाती कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास चालू आहे.या प्रकारामुळे पोलीस खात्यात व श्रीरामपूर शहरात खळबळ उडाली आहे.