शिवप्रहार न्यूज-शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; साखर कामगार रूग्णालयात उपचार सुरू…
शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; साखर कामगार रूग्णालयात उपचार सुरू…
श्रीरामपूर - दिवसेंदिवस कांद्याचे भाव कमी होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. काल गुजरवाडी येथील शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेला कांदा नाकारण्यात आल्याने एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात कांदा बाजार सुरू आहे. काल गुजरवाडी येथील शेतकरी भरत जाधव यांनी आपला कांदा उपबाजारात विक्रीसाठी आणला होता. तीन आडत्यांकडे कांदा विक्रीस लावला होता. कांदा लिलावासाठी आणला होता. लिलावाचा अधिकृत दिवस नसल्याने त्यांच्या नेहमीच्या आडतीवर वक्कलातील कांदा गोणी फोडली असता तो माल नो बीट झाला. बाकीच्या आडतीवरील लिलाव मंगळवारी होणार होते.
मात्र एका आडतीवरील कांदा नो बीट झाल्याने हतबल होऊन जाधव यांनी काही वेळाने विषारी पदार्थाची बाटली आणून उपबाजार विषारी पदार्थ प्राशन केले. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने जाधव यांना श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.