शिवप्रहार न्यूज -विखे पाटलांनी नगर जिल्हयात ३०० रेमडेसीवीर चे केले मोफत वाटप ; श्रीरामपुरातील नेतेमंडळींनीही असे करुन जनसामान्यांना दिलासा द्यावा...

शिवप्रहार न्यूज -विखे पाटलांनी नगर जिल्हयात ३०० रेमडेसीवीर चे केले मोफत वाटप ; श्रीरामपुरातील नेतेमंडळींनीही असे करुन जनसामान्यांना दिलासा द्यावा...

विखे पाटलांनी नगर जिल्हयात ३०० रेमडेसीवीर चे केले मोफत वाटप ; श्रीरामपुरातील नेतेमंडळींनीही असे करुन जनसामान्यांना दिलासा द्यावा...

राहता - भाजपचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील परीवाराने नगर जिल्ह्याकरिता ३०० रेमडीसिवीर इंजेक्शनची विनामुल्य उप्लब्धता करून देत मोठा दिलासा दिला आहे . राहता तालुक्यात एक हजार रुग्णाकरिता सुविधा होईल अशी आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला असल्याचे आ. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले .जिल्यात मागील काही दिवसांपासून कोव्हीड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे . त्यामुळे रेमडेसीवीरची मागणी देखील प्रचंड वाढली असल्याने काळ्या बाजारात रेमडेसीवीर ची विक्री वाढीव दराने होत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी ही अडचण दूर करण्यासाठी आ.विखे आणि खा.सुजय विखे यांनी जिल्ह्यात ३०० रेमडीसिवीर चे मोफत वाटप केले आहे.

          या पाश्वभुमीवर श्रीरामपुरातील नेतेमंडळींनी देखील आपापल्यापरीने शक्य होईल तेवढे रेमडेसीवीर इंजेक्शन सर्वसामान्य जनतेला मोफत उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी जनसामान्यांकडुन होत आहे.जनतेला या संकटात मदत केली तर नगरपालिका निवडणूकीच्या वेळेस जनता सुद्धा या नेतेमंडळींना विसरणार नाही ही बाब नेतेमंडळींनी लक्षात ठेवावी.

कारण संकटात कोणता नेता किती मदत करत आहे आणि कोण फक्त पेपरबाजी करुन शायनिंग मारत आहे याकडे जनतेचे चांगलेच लक्ष आहे.