शिवप्रहार न्यूज -साईबाबा हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये विनापरवाना प्रवेश केला म्हणून काँग्रेस शहराध्यक्षावर गुन्हा दाखल...

शिवप्रहार न्यूज -साईबाबा हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये विनापरवाना प्रवेश केला म्हणून काँग्रेस शहराध्यक्षावर गुन्हा दाखल...

साईबाबा हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये विनापरवाना प्रवेश केला म्हणून काँग्रेस शहराध्यक्षावर गुन्हा दाखल...

 शिर्डी -याबाबतची हकीकत अशी की,दिनांक 9 मे ते 10 मे च्या मध्यरात्री श्री.साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था,शिर्डी या अंतर्गत असलेल्या श्री.साईबाबा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, शिर्डी ,तालुका राहाता येथील कोवीड क्षेत्र निषिद्ध हे असतांना तेथे कोणाला जाण्याची परवानगी नसतांना आयसीयूमध्ये तसेच इतर covid-वार्डामध्ये कोणाची परवानगी न घेता ,पीपीई कीट परिधान न करता, कुठलीही दक्षता न घेता प्रवेश केला व उपचार घेत असलेल्या रुग्णांना भेटले म्हणून सचिन चौगुले , अध्यक्ष- शिर्डी काँग्रेस कमिटी शिर्डी शहर, राहणार -शिर्डी व अरुण जाधव ,धंदा -शिर्डी संस्थान विद्युत विभाग कर्मचारी यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 159 /2021 भादवि कलम 188 ,269 ,271 , साथरोग अधिनियम 1897 चे कलम 2 तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 प्रमाणे फिर्यादी श्री.किशोर साहेबराव गवळी ,वय 44 ,धंदा -नोकरी -प्रभारी अधिकारी सीसीटीव्ही कंट्रोल ,श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था ,शिर्डी यांच्या तक्रारीवरून आज दिनांक 14/5/2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्री.रूपवते हे करीत आहेत.