शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूर मालधक्क्यावर ट्रकचा ब्रेक फेल; १ फ्रॕक्चर

शिवप्रहार न्यूज -  श्रीरामपूर मालधक्क्यावर ट्रकचा ब्रेक फेल; १ फ्रॕक्चर

श्रीरामपूर मालधक्क्यावर ट्रकचा ब्रेक फेल; १ फ्रॕक्चर

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर येथील बसस्टॅन्डसमोरील रेल्वेचा मालधक्का येथे काल दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ च्या सुमारास एक मालवाहतूक ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने या ट्रकने एका स्प्लेंडर मोटारसायकल चालकाला धडक देत हा ट्रक क्र.एमएच १६ बी २३९६ जोरात भिंतीवर जाऊन आदळला. स्प्लेंडर क्र. एमएच १७ एक्यु ४१०३ वरील दिलीप नावाचा चालकाला या अपघातात पायाला मोठा मार लागल्याने तो फ्रॕक्चर झाला आहे. त्याच्यावर साखर कामगार रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. सदर ट्रकच्या एअरब्रेकने एअरप्रेशर न धरल्याने हा अपघात झाल्याचे घटनास्थळी चर्चा होती. सदर मालधक्क्याला लागूनच श्रीरामपूर-नेवासा रोड असल्याने तेथे सतत वाहनांची गर्दी असते. सदर अपघातग्रस्त ट्रक भिंतीवर जाऊन आदळल्याने तो थांबल्याने मोठा अनर्थ टळला.