शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात “आप”च्या वतीने पंजाब विजयाचा जल्लोष…
श्रीरामपुरात “आप”च्या वतीने पंजाब विजयाचा जल्लोष…
श्रीरामपूर-दिल्ली पाठोपाठ आता पंजाब मध्ये देखील आम आदमी पार्टी चे सरकार स्थापन होत असल्याने सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे.याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर येथे अहमदनगर जिल्हा आम आदमी पार्टी च्या वतीने श्रीरामपूर शहरात जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी महात्मा गांधी पुतळ्या जवळ एकत्र जमत हा ढोलीबाजा सह फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाईचे वाटप करून जल्लोष साजरा केला. (यावेळी वेदांश डुंगरवाल याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सारखी वेशभूषा धारण करून छोटे केजरीवालांची भूमिका पार पाडली सर्वत्र चर्चेचा विषय ठरला)
या वेळी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल बोलताना म्हणाले की पक्ष प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने दिल्ली राज्यामध्ये अतिशय सुंदर काम करत जनतेची सेवा केली आहे,ज्यात हॉस्पिटलमध्ये केलेली सुधारणा, मोफत पिण्याचं पाणी,मोफत वीज,सरकारी शाळांचा दर्जा सुधारणा,महिला सुरक्षा अश्या अनेक विविध प्रकारच्या सुविधा आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या आहे.आणि तेच विकासाचा आप च दिल्ली मॉडेल अवघ्या देशाने पाहिलेलं आहे त्यामुळे आज पंजाब मध्ये आप च सरकार स्थापन होत आहे,पण येत्या काळात संपूर्ण देशाला आम आदमी पार्टी सारख्या पारदर्शक कारभार असलेल्या पक्षाची गरज पडेल आणि ते होईल सुद्धा असा विश्वास या वेळी डुंगरवाल यांनी व्यक्त केला आणि सोबत येत्या काळात अहमदनगर जिल्ह्यात महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी सक्षम पणे भाग घेईल आणि दिल्ली येथील विकासकामांच्या जोरावर मोठ्या मताधिक्याने आप चे उमेदवार निवडून येतील असा आत्मविश्वास असल्याचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी बोलून दाखविले.
याप्रसंगी आपचे नॅशनल कौन्सिल सदस्य किरण उपकारे हे बोलताना म्हणाले की आम आदमी पक्ष हा फक्त समाजहित जोपासून प्रत्यक्ष कार्य करणारा पक्ष आहे म्हणुनच पक्ष प्रमुख केजरीवाल साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून दिल्ली येथे आप ची एक हाती सत्ता आहे.येणाऱ्या पालिका निवडणुकीतही आम आदमी पार्टी चे उमेदवार आम्ही उभे करू व जिंकून आणून त्यांच्या मार्फत कामकाजातील पारदर्शकता दाखवून देऊ असा ठाम विश्वास उपकारे यांनी व्यक्त केला.यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड,हानिफ बागवान तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा कोषाध्यक्ष दिनेश जाधव,
प्रवक्ते प्रवीण जमधडे यांच्यासह आदींचे भाषणे झाली यावेळी आपचे राहुल रणपिसे,दिनेश यादव ,बी एम पवार,निलेश गीते,प्रवीण राठोड, यशवंत जेठे,अक्षय बिराडे ,संजय भिंगर्दिवे, नीरज वैद्य, ऋषिकेश बाबा, लोंढे दिनेश ,सोनवणे शुभम, कवडे अक्षय, जाधव जगवळे ,गोकुळ जगवळे, चेतन भोगे, कार्तिक गावडे ,यशवंत जेठे, उमेश जेठे ,उमेश जेठे ,आदित्य ससाने, आदित्य मोरे, महेश भालेराव, साहिल मिर्झा ,समीर शेख ,अनिकेत जोरेकर, सोमनाथ मुळे, यशवंत जेठे, अभिषेक राऊत ,सागर होले ,गोपाल होले ,विकास अडांगळे ,बंटी सरोदे ,सागर देवकर, कार्थिक रोशन ,राजपूत परवेज, शुभम देवकर ,त्रिभुवन माऊली, येवले विजय, होळकर समीर शेख, केतन जगवळे, भरत डेंगळे, सचिन थोरात ,राहुल डांगे राहुल राऊत ,निलेश यादव ,राहुल केदार, राहुल रणपिसे, किरण डेंगळे ,गायकवाड मनोज गायकवाड ,मोहन तेलोरे महेश रासकर, देवराज मुळे ,हेमंत डाके, महेश पप्पू जेथे ,बंटी जाधव, गणेश घाडगे, फरीद शेख, गणेश फुलारे यांच्या सह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.