शिवप्रहार न्यूज- निवेदन देऊन देखील श्रीरामपूर शहर व बेलापूर-टाकळीभानसह काही भागात अवैध धंदे चालुच असल्याने शिवप्रहारचे उपोषण सुरू…

शिवप्रहार न्यूज- निवेदन देऊन देखील श्रीरामपूर शहर व बेलापूर-टाकळीभानसह काही भागात अवैध धंदे चालुच असल्याने शिवप्रहारचे उपोषण सुरू…

निवेदन देऊन देखील श्रीरामपूर शहर व बेलापूर-टाकळीभानसह काही भागात अवैध धंदे चालुच असल्याने शिवप्रहारचे उपोषण सुरू…

श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील अवैध धंद्यांमुळे अनेक नवतरुणांचे आयुष्य व अनेक महिलांचे सुखी संसार उध्वस्त होत आहे.म्हणून आपण भूमिका घ्यावी अशी मागणी काही नागरिकांनी केल्याने “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडी”च्या वतीने प्रशासनाला अवैध धंदे बंद व्हावे याकरिता निवेदन देण्यात आले होते.     

         परंतु निवेदन दिल्यानंतर देखील श्रीरामपूर शहरासह बेलापूर व टाकळीभान भागात अनेक अवैध धंदे चालूच असल्यामुळे “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडी”च्या वतीने आज सकाळपासून गांधी पुतळ्याजवळ आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.या उपोषणामध्ये “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडी”चे चंद्रशेखर (चंदू)आगे,प्रशांत भोसले ,योगेश सोनार ,गणेश माळवे,सागर शेळके ,दीपक संत सह इतरांचा सहभाग आहे.