शिवप्रहार न्यूज - लोकसत्ता चे उपसंपादक,ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे (राजे) यांचे निधन...

शिवप्रहार न्यूज - लोकसत्ता चे उपसंपादक,ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे (राजे) यांचे निधन...

लोकसत्ता चे उपसंपादक,ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे (राजे) यांचे निधन...

  श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील पढेगावचे रहीवासी आणि जिल्ह्यातील पत्रकारितेतील अतिशय निर्भीड, अभ्यासू, धारधार व्यक्तिमत्व असलेले अशोक तुपे यांचे आज दुपारी दु:खद निधन झाले.गेल्या महीन्याभरापासुन अशोक तुपे हे नगरच्या साईदीप रुग्णालयात उपचार घेत होते.

              ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे म्हणजे आपल्या निर्भिड लेखणीने सत्यता मांडणारा दिलदार माणूस होय.नगरच्या ग्रामीण पत्रकारीतेतील एक दीपस्तंभ म्हणुन पत्रकार अशोक तुपे यांच्याकडे पाहीले जात होते. समाजकारण,राजकारण,शेतीसह सगळ्याच क्षेत्रात त्यांनी आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटवला होता. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्राची मोठी हाणी झाली आहे.

अशोक तुपे यांना त्यांचा मित्रपरिवार “राजे’‘

या नावाने संबोधत असे.

          स्वर्गवासी अशोक तुपे यांना दैनिक जय बाबा परिवार,शिवप्रहार न्युज परिवार कडुन भावपूर्ण आदरांजली. 

परमेश्वर तुपे कुटुंबियांना या धक्क्यातून सावरण्याची शक्ती देवो.