शिवप्रहार न्यूज- विषारी औषध पोटात गेल्याने तरुणीचा मृत्यू ..
विषारी औषध पोटात गेल्याने तरुणीचा मृत्यू
श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथील साक्षी दादासाहेब भोसले वय-18 या तरुणीच्या पोटात काहीतरी विषारी औषध गेल्याने तिचा मृत्यू झाला. विषारी औषध पोटात गेल्याने तरुणीला कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना साक्षी हिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस निरिक्षक साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ बर्डे हे करीत आहेत.