शिवप्रहार न्यूज- धडाकेबाज पोलीस अधिकारी सुनिल कडासने यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे विशेष पदक...
धडाकेबाज पोलीस अधिकारी सुनिल कडासने यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे विशेष पदक...
नाशिक- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक परिक्षेत्र चे एस.पी.धडाकेबाज पोलीस अधिकारी श्री.सुनिल कडासने यांनी राज्यभर गाजलेल्या शिर्डी येथील कुख्यात गुन्हेगार पाप्या शेख व त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या रचित पाटणे व प्रविण गोंदकर या गंभीर दुहेरी संवेदनशील हत्याकांडाच्या मोक्का अंतर्गत गुन्ह्याचा अत्यंत उत्कृष्ट तपासकरून त्याचा छडा लावून एकुण 17 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली व 1 कोटी 38 लाख रुपयेचा दंड झाला. म्हणून पोलीस अधीक्षक (एसपी) सुनील कडसने यांना संवेदनशील अशा दुहेरी हत्याकांडातील गुन्ह्याचा अतिउत्कृष्ट दर्जाचा तपास (Excellence in Investigaation) केला म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस दलातील मानाचे असे “युनियन होम मिनिस्टर” पदक जाहीर केले
आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील 10 पोलीस अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. तर देशातील 152 अधिकाऱ्यांना हे पदक मिळाले आहे.
त्यांना मिळालेल्या या विशेष सन्मानामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.