शिवप्रहार न्यूज- अकील शेखला नायगाव फाट्यावर रामपुरी चाकू लावून भगवान पवार ने ढंपर पळवला ; पवारवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल....

शिवप्रहार न्यूज- अकील शेखला नायगाव फाट्यावर रामपुरी चाकू लावून भगवान पवार ने ढंपर पळवला ; पवारवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल....

अकील शेखला नायगाव फाट्यावर रामपुरी चाकू लावून भगवान पवार ने ढंपर पळवला ; पवारवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल....

 श्रीरामपूर-
श्रीरामपूर- वैजापूर रोड वरील गोदावरी तिराजवळ नायगाव फाटा येथे आरोपी भगवान बापू पवार,राहणार-रामपूर,तालुका-श्रीरामपूर याने फिर्यादी अकील अजीज शेख ,वय-43 ,धंदा-ड्रायव्हर,राहणार- आशीर्वाद नगर, वॉर्ड नंबर 1,श्रीरामपूर. चालवत असलेला डंपर थांबवण्याचा इशारा करून अकिलच्या डंपर चा वेग कमी होताच भगवान पवार याने त्याच्या हातातील रामपुरी चाकूचा धाक दाखवून फिर्यादी अकिल शेखच्या ताब्यातील एक लाख बावीस हजार रुपये किमतीचा डंपर क्रमांक -
 एम एच 17 ए जी 3744 व पाच हजार शंभर रुपये रोख रक्कम असा १,२७,१०० रुपये किंमतीचा माल घेऊन भरधाव वेगाने वैजापूर च्या दिशेने वैजापूर रोडने पळून गेला म्हणून अकील शेख यानी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने काल २७/०४/२०२१ रोजी सायंकाळी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 93/2021 भादंवि कलम 392,323 ,504,506 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
          या गुन्ह्याचा तपास श्रीरामपुर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बोरसे हे करीत आहेत. हा गुन्ह्या वाळु तस्करीतुन घडला असावा अशी दबक्या आवाजात गोदावरी तिरावरील गावांत व श्रीरामपुरात चर्चा आहे.