शिवप्रहार न्यूज- पैशासाठी शेतकऱ्याचा खून ! मृतदेह पुरला ! दोघांना अटक ! 

शिवप्रहार न्यूज- पैशासाठी शेतकऱ्याचा खून ! मृतदेह पुरला ! दोघांना अटक ! 

पैशासाठी शेतकऱ्याचा खून ! मृतदेह पुरला ! दोघांना अटक ! 

संगममेर / अकोले (शिवप्रहार न्युज )- पैशाच्या व्यवहारातून शेतकऱ्यांचा खून करून त्याचा मृतदेह टमाट्याच्या शेतात बांधालगत खड्डे घेवून पुरुन टाकला.या गंभीर प्रकरणी राजुर पोलीसांनी कसून तपास करीत हा खुनाचा गुन्हा करणारे आरोपी बारकु ऊर्फ भाऊसाहेब रखमा महाले व अशोक बाळशीराम फापाळे, दोघे राहणार- जाचकवाडी,ता अकोले यांना अटक करण्यात आली आहे.

      सपोनि घुगे यांनी सखोल तपास करत आरोपी पकडले.आरोपीं विरुद्ध भादंवि कलम ३o२, २०१, ३४ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.कांद्याचे पैशाचे व्यवहारातून आरोप महाले व फापाळे यांनी लामखडे यांच्या डोक्यात फावडे मारून मफलरने गळा आवळून खून केला व जाचकवाडी परीसरात मृतदेह पुराला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला . 

     घटनास्थळी डीवायएसपी सातव, सपोनि घुगे यांनी भेट दिली . पुढील तपास सुरु असून व्याजाचे पैशाचा प्रकार आहे का ? याचाही तपास सुरु आहे .