शिवप्रहार न्यूज- पावणेसहा लाखाची दारू पोलिसांनी ओतली गटारीत…
पावणेसहा लाखाची दारू पोलिसांनी ओतली गटारीत…
राहुरी - राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अनेक वर्षापासून दारूबंदीच्या गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल पडून होता.सन 2018 पासून जवळपास दीडशे गुन्ह्यातील पावणेसहा लाखाची दारू त्यामध्ये देशी-विदेशी दारूच्या बाटल्या पडून असल्यामुळे पोलीस निरीक्षक दराडे यांनी न्यायालयाकडून या दारूला नष्ट करण्याची परवानगी मिळवली.
त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राहुरी पोलिसांनी पावणेसहा लाख देशी-विदेशी दारुचा मुद्देमाल गटारीत टाकून नष्ट केला.