शिवप्रहार न्यूज- गेल्या रविवारच्या थरारानंतर काल दुसऱ्या एका बिबट्याने उक्कलगावात केले कुत्रे ठार…

शिवप्रहार न्यूज- गेल्या रविवारच्या थरारानंतर काल दुसऱ्या एका बिबट्याने उक्कलगावात केले कुत्रे ठार…

गेल्या रविवारच्या थरारानंतर काल दुसऱ्या एका बिबट्याने उक्कलगावात केले कुत्रे ठार…

 श्रीरामपूर- गेल्या रविवारी श्रीरामपूर शहरामध्ये मोरगे वस्ती भागात बिबट्याने धुमाकूळ घालून हैदोस मांडला होता.यामध्ये सात ते आठ जण जखमी झाले होते. तर नंतर यातील एक जखमी वनकर्मचारी लक्ष्मण किंकर यांचा उपचार घेताना मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव परिसरात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करून त्याचा जीव घेतला आहे.

        याबाबत अधिक माहिती अशी की,बेलापूर-कोल्हार रोडवर उक्कलगाव भागातील बिरोबा वस्तीत माजी शिक्षक विजय नामदेव मोरे यांचे घर आहे.या घराचे कंपाउंड तोडून बिबट्या घराच्या आवारात घुसला आणि मोरे यांच्या पाळीव कुत्र्याला झडप घालून ओढत नेले.या हल्ल्यात कुत्र्याचा मृत्यू झाला आहे.

       सध्या ऊसतोड चालू असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी जागा कमी पडत आहे.त्यामुळे बिबट्यांचा वावर मानवी वस्ती मध्ये दिसू लागला आहे. ऊसतोडी मुळे बिबट्यांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी शेतकरी व नागरिकांनी काळजी घ्यावी.