शिवप्रहार न्युज - तुफान वादळात आदिवासी कुटूंबाच्या घराची पडझड; मदतीची मागणी 

शिवप्रहार न्युज -  तुफान वादळात आदिवासी कुटूंबाच्या घराची पडझड; मदतीची मागणी 

तुफान वादळात आदिवासी कुटूंबाच्या घराची पडझड; मदतीची मागणी 

संगमनेर(शिवप्रहार न्युज)- शनिवार दिनांक 15/04/2023 रोजी सायंकाळी संगमनेर परिसरात तुफान अवकाळी वादळ आले. ओझर खुर्द (नेमबाई माळ) येथील आदिवासी समाजाचे रमेश पंजा बर्डे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरकुलाचे पत्रे या अवकाळी वादळात उडून पडले तर भिंतींच्या विटाही निखळून पडल्या आहेत. शनिवार दिनांक 15/04/2023 रोजी सायंकाळी 05:30 च्या सुमारास आलेल्या या अवकाळी वादळात बर्डे यांच्या घराच्या पडझडीमुळे मोठे नुकसान होऊन त्यांचे कुटूंब उघड्यावर आले आहे. बर्डे निवऱ्याची मोठी गैरसोय झाली असून शासनाने तातडीने पंचनामा करून शासकीय मदत द्यावी अशी मागणी बर्डे कुटूंबियांनी केली आहे.