शिवप्रहार न्यूज- “तुझ्या नवऱ्याला सोडून तू माझ्याबरोबर रहायला ये” म्हणत महिलेचा श्रीरामपुरात विनयभंग…

शिवप्रहार न्यूज- “तुझ्या नवऱ्याला सोडून तू माझ्याबरोबर रहायला ये” म्हणत महिलेचा श्रीरामपुरात विनयभंग…

“तुझ्या नवऱ्याला सोडून तू माझ्याबरोबर रहायला ये” म्हणत महिलेचा श्रीरामपुरात विनयभंग…

 श्रीरामपूर (प्रतिनिधी)- ३० वर्षीय तरूण विवाहीतेच्या मोबाईलवर फोन करून तू मला फार आवडेस, तुझ्या नवऱ्याला सोडून तू माझ्याबरोबर रहायला ये, असे म्हणत महिलेला धमकी देवून तिचा विनयभंग करण्याचा प्रकार श्रीरामपुरात घडला आहे.

      सदर प्रकार हा श्रीरामपूर शहरातील वा.नं.७ मधील कॅनॉल परिसरात घडला आहे. याबाबत बेलापूररोड परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिली आहे, त्यात म्हटले आहे की, मे २०२१ पासून ते १६ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १ वाजेपर्यंच्या काळात वेळोवेळी सरस्वती कॉलनी, वा.नं. ७, श्रीरामपूर येथे राहुल पतंगे व त्याचा भाऊ सचिन पतंगे, रा.सरस्वती कॉलनी, वा.नं. ७, श्रीरामपूर यांनी माझा पाठलाग केला. तसेच राहुल पतंगे याने माझ्या मोबाईलवर फोन करून 'मला तू फार आवडतेस, तू तुझ्या नवऱ्याला सोडून माझ्याबरोबर रहायला ये असे म्हणून मला वाईट - वाईट शिवीगाळ करून तू जर माझी झाली नाही तर मी तुझ्या नवऱ्याला तसेच मुलाला मारून टाकीन आणि मी माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेईल, अशी धमकी दिली.तसेच तुला गुंतवून टाकील, अशी देखील धमकी दिली व राहुल पतंगे याने तू जर आमच्यावर गुन्हा दाखल केला तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली असे सदर महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

       सदर ३० वर्षीय खासगी नोकरी करणाऱ्या विवाहीत महिलेच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसात राहुल पतंगे आणि सचिन पतंगे, रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ (ड) (१) (२), ५०४, ५०६ प्रमाणे गुरनं. ६६७/२०२२ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना.अहिरे करत आहे.