शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरातील हॉटेलात लव्ह जिहाद सारखा प्रकार;अमीरवर पोक्सो,ॲट्रोसिटी दाखल...

श्रीरामपुरातील हॉटेलात लव्ह जिहाद सारखा प्रकार;अमीरवर पोक्सो,ॲट्रोसिटी दाखल...
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- लज्जा उत्पन्न होईल असे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून,अल्पवयीन मुलीला शहरातील वार्ड ०७ मधील हॉटेल विजयमध्ये बोलावून तिचा विनयभंग करणाऱ्यावर श्रीरामपूर शहर पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सकृतदर्शनी हा लव्ह जिहाद चा प्रकार असल्याचे दिसत आहे.
याबाबत मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे की, सायं. ६ ला आपण आपल्या कामाच्या ठिकाणी असतांना दोघा जणांनी आपल्याला सांगितले की, तुमची मुलगी ही श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं.७ मध्ये असणाऱ्या हॉटेल विजयमध्ये एका मुलासोबत आहे. तेव्हा मुलीच्या आईने तातडीने शहरातील वॉर्ड नं.७ मध्ये असणाऱ्या हॉटेल विजय येथे जाऊन बघितले असता अमीर अजीज शेख, रा.भोकर, ता. श्रीरामपूर हा आपल्या मुलीला तेथे घेवून बसलेला दिसला. या अगोदरही मुलीसोबतचे फोटो काढून तिची बदनामी करत असल्याने तालुका पोलीस स्टेशनला ४ जानेवारीला मुलीच्या आईने त्याच्याविरूद्ध तक्रार दिली होती. तेव्हा गावातील नातेवाईकांनी मध्यस्थी केली होती. काल आपण वॉर्ड नं.७ मध्ये असणाऱ्या हॉटेल विजय येथे गेल्यावर मुलीला विचारले की तू इकडे काय करत आहे? तेव्हा तिने सांगितले की,मला अमीर हा त्याच्यासोबत घेवून आला आहे. त्याबाबत आपण त्याला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.अमीर शेख याने कशाचेतरी फूस लावून तिला या ठिकाणी घेवून आला. तसेच जुने फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून सदर तरूण आपल्याला हॉटेल विजय येथे घेवून आला असे मुलीने तिच्या आईला सांगितले.
दरम्यान सदरचा मोबाईल मुलीच्या आईने तपासला असता त्यात मुलीला लज्जा उत्पन्न होईल, अशाप्रकारचे त्यांचे फोटो असल्याचे दिसून आले. त्यामुळे आपल्या अल्पवयीन मुलीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन आरोपीने केल्याचे फिर्यादीत म्हटले असून सदर मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अमीर शेख याच्याविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात अॅट्रॉसिटीसह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अमीर अजीज शेख याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोनि. नितीन देशमुख यांनी दिली आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.तसेच हा लव्ह जिहाद चा प्रकार आहे का ? याचाही तपास होणे आवश्यक आहे.कारण सरकारही लव्ह जिहाद कायद्यासाठी प्रयत्नशील आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कायद्यासाठी आग्रही आहे.