शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरात वीज चोरी प्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा… 

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरात वीज चोरी प्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा… 

श्रीरामपूर शहरात वीज चोरी प्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा… 

श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील बेलापूर रोड जवळ असणाऱ्या सिल्वर स्पून या हॉटेल चालकाविरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

       याबाबत अधिक माहिती अशी की,सिल्वर स्पून हॉटेलात एकूण 11 लाख 78 हजार रुपयांची महावितरणच्या खांबावर मेटल बॉक्स- लोखंडी बोर्डचा वापर करून वीज चोरी करण्यात आली म्हणुन सदर हॉटेल चालक प्रमोद भाऊसाहेब लबडे,राहणार-श्रीरामपूर विरोधात महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री.गोकुळ रामदास मानवट यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय वीज कायद्याप्रमाणे हा वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास श्रीरामपूर पोलिसांकडून चालू आहे.