शिवप्रहार न्युज - मा.नगराध्यक्ष संजय फंड यांच्यासह माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश...

शिवप्रहार न्युज -  मा.नगराध्यक्ष संजय फंड यांच्यासह माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश...

मा.नगराध्यक्ष संजय फंड यांच्यासह माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश...

 मुंबई/श्रीरामपूर - श्रीरामपूरचे माजी नगराध्यक्ष,कांग्रेसचे नेते संजय फंड यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी माजी नगरसेवक शशांक रासकर,श्रीराम दुबैय्या,शिंदे,धनवटे,लबडे,अदिक इत्यादीं काही माजी नगरसेवकांनी व इतर कांग्रेस कार्यकर्त्यांनी आज दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी मुंबई येथे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

       या प्रवेशामुळे श्रीरामपूरचे राजकीय समीकरण बदलणार असून आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये याचे परिणाम दिसणार आहे.ज्या सेक्युलर राजकारण्यांच्याविरुद्ध संघर्ष करुन भाजप कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर राजकीय हिंदुत्व जिवंत ठेवले.त्यातीलच काही चेहरे आता भाजपमध्ये आल्याने भाजपचे मूळ कार्यकर्ते काय भूमिका घेणार ? याकडे सर्व श्रीरामपूरचे लक्ष लागले आहे.