शिवप्रहार न्यूज- भांडवली पत्रकारीता क्षेत्रात 'वटवृक्ष ' निर्माण करणारे आमचे दादा अॅड.शंकरराव आगे ... 

शिवप्रहार न्यूज- भांडवली पत्रकारीता क्षेत्रात 'वटवृक्ष ' निर्माण करणारे आमचे दादा अॅड.शंकरराव आगे ... 

भांडवली पत्रकारीता क्षेत्रात 'वटवृक्ष ' निर्माण करणारे आमचे दादा ॲड.शंकरराव आगे ... 

श्रीरामपूर- (जेष्ठ पत्रकार मनोज शंकरराव आगे लिखीत) नगर जिल्ह्यातील पत्रकारीतेत व वकीली व्यवसायात स्वकर्तुत्वाने नाव कमविणारे आणि वृत्तपत्र क्षेत्रात भांडवलदारांचाच दबदबा असतांना एक आदर्श ' वटवृक्ष' निर्माण करणारे माझे वडील कै.शंकरराव आगे वकील यांच्या जीवन वाटचालीचा प्रेरणादायी कष्टातुन नावलौकीक मिळवीणारी आठवणींची माहीती आज दशक्रिया विधी निमित्ताने ..! माझे वडील शंकरराव आगे हे ७७ वर्षापूर्वी श्रीरामपुरात आई स्व . सुंदरबाई व बहीण द्रोपदाबाई यांच्यासह आले.ते मेनरोडवर गीरमे बिल्डींग येथे १२ x ८ च्या खोलीत रहायचे.त्यांचे लग्न बेलापूर येथील स्व. विठ्ठलराव मोहीते यांची मोठी कन्या सुनिताबाई यांच्या बरोबर १९६७ ला झाले. दादा याकाळात लोकांना बैल गाडीने पाणी पुरवीणे, लोकांच्या घरी त्यांचे आईला कामात मदत करणे,किशोर थिएटरमध्ये डोर कीपर अशी अनेक कष्टाची कामे करत होते. गिरमे बिल्डींगमध्ये राहणारे स्व . खंडूशेठ व्यवहारे,स्व भानुशेठ जाधव, स्व आप्पा गिरमे ,नाना सुरडकर,कृष्णादादा सुरडकर, करंडे,झंवर,देशपांडे,लींगे, गोखले या कुटटुंबाशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध दादांचे होते.त्याच वेळी स्व . मा .आ . जनार्दन टेकावडे यांच्या पॅनल मधून स्व. व्यवहारे निवडणुक लढले आणि विजयी झाले.दादांनी त्यावेळी निवडणुक प्रचारात परिश्रम घेतले.स्व.खडूशेठ व्यवहारे नगरसेवक व टेकावडे नगराध्यक्ष झाले.तेथे दादांचा टेकावडेशी जवळून संबध आला.

      दादांनी त्यांची बहीणी द्रोपदाबाई हीचे पती स्वं .एकनाथ तारडे ,केंदळ बु ॥ यांना श्रीरामपूर नगरपालीकेत नोकरी लावली ! जेष्ठ पत्रकार स्व . एस . व्ही. कुलकर्णी बाप्पा यांच्याशी दादांचा संबंध आला आणी बाप्पानीं दादाना बातमी लीहिण्यास शिकविले. पत्रकारीता करतांना त्यांनी नाशिकचा गावकरी पेपरचे श्रीरामपुरात एजन्सी व प्रतिनिधी म्हणून काम केले.पुढे स्व.ज्ञानदेव पाटील थोरात, उक्कलगाव यांच्याशी संपर्क झाला.त्यांनी दादांना सुतगीरणीत नोकरीस संधी दिली आणि दादानीं येथून पुढे संधीचे सोने केले ! स्व मा खा.बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी त्यांचे विश्वासाचे संबध निर्माण झाले.यांनी सा.विठ्ठल प्रभा वृत्तपत्र सुरु केले.मला सा.प्रवरा टाईम्स वृत्तपत्र काढायला सांगीतले.ते श्रीरामनवमी च्या दिवशी सुरु झाले. त्याची छपाई नगर येथे प्रकाश रामभाऊ निसळ यांच्या आझाद हिंन्द प्रेसमध्ये केली जायची ! 

      त्यानंतर दादांनी वार्ड नं.०७ येथील आमच्या घराजवळ मला पायाने चालविणारे ट्रेडल प्रिन्टीग मशीन घेवून दिले व आमची बहीण उज्वला हीचे नावाने स्वतःचा प्रेस सुरु झाला.त्या दादांच्या कष्टाला आमची साथ मिळाली.मग वीजेवर चालनारे ट्रेडल प्रिन्टीग मशीन घेतले.अक्षर जुळवणी करून पेपर छपाई सुरु झाली.त्यानंतर मालेगांव येथून शर्माजी यांचे छोटे हॅन्डफील्ड प्रिटीग मशीन आणले.नंतर रत्नागिरी येथून वेब मशीन आणले व ते आज अखेर जोरात सुरु आहे.याच दरम्यान सायं दैनिक श्रीरामपूर एक्सप्रेस सुरु केले.त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.याकाळात भाऊ बाळासाहेब, भाऊ कैलास हे वकील झाले.बहीण उज्वलाताई प्राध्यापिका झाली.लहाणी बहीण मिनाक्षीताई पदवीधर झाली. सर्वांना दादानी शिकविले! बाळासाहेब यांनी वकीली सोडून प्रेसमध्ये काम सुरु केले ! कैलास या भावाने मुळा प्रवरात नोकरी करून प्रेसला पुर्ण कामात मदत केली.याच काळात श्रीरामपूर एक्सप्रेस बंद करूण सायं दैनिक जयबाबा सुरु केले.त्याला प्रचंड मोठे यश आले !

         शेतीत दादा खुप कष्ट करायचे मी त्यांना मदत करायचो.नंतर कैलास यांनी शेती सांभाळली.दादानीं सर्व मुलांची लग्न केली. ३मेहुन्या, ४ मेहुने यांचे लग्नात तन मन धनाने सहभाग घेतला.राधाकीसन दरेकर व गोल्हार या साडुंना प्रवरेत नोकरी लावून दिली ! सुतगिरणीत ऑफीस सुप्रीटेंडंट असतांना त्यांनी राजुरी,अस्तगांव गोल्हारवाडी,चोळकेवाडी,मोरवाडी येथील सुमारे २०० हुन जादा जणाना नोकरीत संधी दिली ! सुतगीरणीत राजकीय संघर्षातून नोकरी गेली.म्हणुन पुढे दादांनी वकीली सुरु केली त्यात त्यांनी मोठ नाव केले.शेकडो वकील मंडळी दादांचे सहकारी आहेत ! दादा धार्मिक वृत्तीचे होते कारण आजी स्व. सुंदरबाई आगे या कार्तिकी एकादशीची श्रीक्षेत्र पंढरपूर वारी करायची तर चैत्र पोर्णीमे ला आदीमाया शक्ती श्री.सप्तश्रृंगी देवी मातेची वारी ! ती आज अखेर घरात सुरु आहे ! दादांनी त्यांची पत्नी व माझी आई सुनिताबाई यांना श्रीक्षेत्र पंढरपूर येथे नेवून श्री.विठ्ठल रूखमणी मातेची महापूजा करविली होती ! मीही दादांना आईला अशीच महापूजा करून आणली.आज त्याचे मोठे समाधान आहे ! दादा एकटे असतांना त्यांनी कठोर परिश्रमातून प्रत्येकाला कष्टाची शिकवण देवून घडविले.

      आज दादाचे मागे मोठी बहीण, पत्नी ,तीन मुले ,दोन मुली ,७ नातू, ४ नाती, २ पनतु ,२ पणती, तीन सुना, तीन नात सुना ,व्याही व नातेवाईक असा मोठा परिवार आहे.त्यात एक नातू सुरज आगे हा पोलीस अधिकारी होता.आज तो शिवप्रहार प्रतिष्ठणच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे आठरा पगडजातींचे विचार प्रसार करतो. तर नातू चंद्रशेखर आगे शिवप्रहार न्युज पोर्टल चालवतो ! नातू ॲड.अक्षय आगे हा वकीली करतो.तर नातू अवधूत जाधव हा अमेरीकेत हारवर्ड येथे युवा शास्त्रज्ञ म्हणून काम करतो ! बाकीचे नातु शिकत आहेत.. ! अशा प्रकारे आमचे दादा शंकरराव आगे यांनी वृत्तपत्र या भांडवली क्षेत्रात कष्टाने पाय रोवून आगे कुटुंबाला ' वट वृक्ष’ केले. त्याच्या फांद्या आणि मुळ्या खोलवर गेल्या आणि एक आगे साहेबांचे आदर्श कुटुब म्हणून दादा आमच्या आगे कुटुंबाला नावलौकीक देवून मोठे करून ०७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८:४५ वा.एकादशी व गणपती उस्तवात गेले ! अशा माझे वडील, माझे गुरु आदरणीय दादांना माझी भावपूर्ण आदरांजली ! 

मनोज शंकरराव आगे,जेष्ठ पत्रकार.