शिवप्रहार न्यूज- पवित्र रमजान पर्वास प्रारंभ...
पवित्र रमजान पर्वास प्रारंभ...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र समजला जाणाऱ्या रमजान महिन्यास संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर प्रारंभ झाला. खूप वर्षानंतर भारतात पहिल्यांदा देशभर एकाच दिवशी रमजान पर्वास प्रारंभ झाल्याचे दिसून आले. काल गुरुवारी संध्याकाळी चंद्र दर्शन झाले आणि रमजान महिन्याचा प्रारंभ झाला. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी रात्री पहिल्या तरावीहची नमाज देखील आदा केली.
यासाठी सर्वच मशिदींमधून व्यवस्था करण्यात आली आहे.
सायंकाळी चंद्र दर्शनानंतर पहाटेच्या सहेरीच्या तयारीसाठी मुस्लिम बांधवांची धावपळ दिसून आली. रमजान निमित्ताने शहरातील जामा मशिदीच्या उत्तुंग मिनार वर सय्यदबाबा उर्स कमिटीचे वतीने रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत आहे.
रमजान पर्वास प्रारंभ झाल्याने अनेक हिंदू बांधवांनी आपल्या मुस्लिम बांधवांना सोशल माध्यमातून शुभेच्छा दिल्या. यावर्षी शुक्रवारच्या पवित्र दिवसापासून रमजान महिन्यास प्रारंभ होत आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारठा असल्याने रोजेदारांना फारसा त्रास होणार नसल्याचे जाणकारांनी सांगितले.